16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड अन् लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर

in #news2 years ago

Prakash-Ambedkar-2.jpgराजीव गिरी, नांदेडः सध्याच्या सरकारमधले १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर अन् लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. राज्यात शिंदे-भाजप सरकारचं काम वेगाने सुरु असतानाच अचानक सरकार पडण्या आणि पाडण्याची वक्तव्य सुरु आहेत. मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रलंबित आहे. सरकारवर टांगती तलवार तर आहेच. त्यातच अनेक बडे नेते शिंदे गटातील आमदार बरखास्त झाले तर काय होऊ शकतं, याबद्दल शक्यता वर्तवत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचा प्लॅन बी सांगितला तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील मोठं वक्तव्य केलंय.