सापा' ने वाढवला खेळाडूंचा ताप, लोकेश राहुलचे लक्ष गेले अन्यथा..

in #news2 years ago

भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर साप शिरल्याचे पाहायला मिळाले. डावाच्या ८व्या षटकात लोकेशचे सापाकडे लक्ष गेले अन् सामना थांबवावा लागला... दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही थोडेसे घाबरले.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल केलेला नाही. आफ्रिकेच्या संघात तब्रेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी मैदानावर उतरला. रोहित शर्माचा आजचा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि एवढे ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आहे. ख्रिस गेल ( ४६३), किरॉन पोलार्ड ( ६१४), शोएब मलिक ( ४८१), रवी बोपारा ( ४२९) , आंद्रे रसेल ( ४२८) आदी खेळाडूंनी ४००+ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. भारताकडून रोहितनंतर दिनेश कार्तिक ( ३६८), महेंद्रसिंग धोनी ( ३६१), विराट कोहली ( ३५४) व सुरेश रैना ( ३३६) यांचा क्रमांक येतो.

लोकेश राहुल व रोहित यांनी भारताच्या डावाची सकारात्मक सुरुवात केली. लोकेशने पहिलाच चेंडू चौकार खेचला, तर रोहितने दुसऱ्या षटकात स्कूप मारून चौकार कमावला. रोहितने आज चौकार मारून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ५०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आजम ( ९३९ धावा, २०२१) याच्यानंतर आता रोहितचाच क्रमांक येतो. भारतीय कर्णधारांमध्ये विराट कोहलीने २०१९मध्ये ४६६ धावा केल्या होत्या. लोकेश-रोहित ही जोडी आज आफ्रिकेच्या गोलंदाजांवर भारी पडताना दिसली. रोहित उत्तुंग फटके मारत होता, तर लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५७ धावा चोपल्या.indvssa2t-13_202210891053.jpg