Nashik : आश्रमशाळेतील सव्वा लाख विद्यार्थ्यांना ‘DBT’चा लाभ

in #news2 years ago

नाशिक : राज्यातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या सुमारे सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना डीबीटीचा लाभ देण्यात आलेला आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी हे अनुदान साडेआठ हजार ते साडेनऊ हजार इतके देण्यात येते. (Half lakh students in ashram schools benefited from DBT nashik Latest marathi news)

आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ५०० आश्रमशाळा चालविल्या जातात. यामध्ये सुमारे दोन लाखांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी मागील चार वर्षांपासून डीबीटीच्या माध्यामातून थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या गणवेश, नाइट ड्रेस, पीटी ड्रेस, स्वेटर, टॉवेल, तेल, टूथपेस्ट, ब्रश, अंडरगारमेंट्‌स, बेडिंग, शालेय व लेखन सामग्री इत्यादी साहित्य खरेदी करावे लागते. यासाठी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आठ हजार ५००, तर नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नऊ हजार ५०० रुपये देण्यात येतात. डीबीटीपूर्वी या सर्व वस्तू विभागाकडून ठेकेदारांकडून खरेदी करून विद्यार्थ्यांना पुरविल्या जात होत्या. मात्र वस्तूच्या दर्जाबाबत वाढत्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे यामुळे या वस्तू खरेदीची कारवाई निर्धारित वेळेत होत नव्हती. त्यामुळे आवश्‍यक साहित्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे शासनाकडून या वस्तूंऐवजी थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.unnamed.jpg

Sort:  

Please like my post follow me sir