Asha Bhosle Birthday: लतादीदींच्या सेक्रेटरीशीच केलं होतं लग्न! बहिणीशी नेहमीच...

in #news2 years ago

How_Asha_Bhosle_sang_the_drug_anthem_Dum_Maro_Dum_instead_of_Lata_Mangeshkar.jpgAsha Bhosle Birthday: जगभरातील संगीत रसिकांना आपल्या अवीट सुरांनी मोहिनी घालणाऱ्या गायिका आशा भोसले यांची लोकप्रियता मोठी आहे. केवळ भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे चाहते आहे. व्हर्सेटाईल (entertainment News) सिंगर म्हणून आशाजी यांना ओळखले जाते. त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, बंगाली यासारख्या सहापेक्षा अधिक भाषांमधून त्यांनी गायन केले आहे. आशाजी (bollywood singer) या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. बदलत्या जमान्यानुसार चालणं हे त्यांच्या स्वभावातील वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

आपण जसे आहोत तसेच कायम राहणं हे फार कमी जणांना शक्य होतं. चित्रपट क्षेत्रासारख्या ग्लॅमरस दुनियेत वावरताना साधेपणा टिकवून ठेवणं देखील सोपं नाही. मात्र आशाजी यांना ते जपले आहे. त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आज आशा भोसले यांचा 89 वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. मंगेशकर बहिणींमध्ये सर्वाधिक चर्चेतील गायिका म्हणजे आशा भोसले. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी. लता मंगेशकर यांच्या नावाचं मोठं वलय कायम सोबत असताना आशाजी यांनी आपल्या गायकीतून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली.