शैलेश लोढा 'तारक मेहता...' च्या निर्मात्यांवर नाराज? म्हणाले- तुम्ही शेवटचं कधी खरं बोलला होतात

in #news2 years ago

मुंबई: ‘तारक मेहता का उल्‍टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी अलविदा केला. त्यांनंतर काही दिवस कार्यक्रमातून तारक मेहता गायब होते. आता कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तारक मेहता परत येत असल्याची घोषणा केली. तारक मेहता ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार सचिन श्रॉफ साकारणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये शैलेश लोढे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टमध्ये शैलेश यांनी तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माता असीत कुमार मोदी यांचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.taarak-mehta-ka-ooltah-chashmah-94189662 (1).jpg