जेष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम; दर महिन्याला मिळणार 9 हजार रुपये

in #newpost2 years ago

मुंबई : सेवानिवृत्तीनंतर आयुष्य कसं जगावं, हा अनेक लोकांसमोर प्रश्न असतो. त्यामुळे नोकरी किंवा कुठलाही व्यवसाय करताना उतारवयातील गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पैशांची तरतूद करून ठेवणं गरजेचं असतं.

बाजारात अनेक पेन्शन योजना असून यात गुंतवणूक करूनही निवृत्तीनंतर सुखी जीवन जगता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री वय वंदना ही योजना अतिशय चांगली मानली जात आहे.

पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पंतप्रधान वय वंदना ही योजना उत्तम पर्याय आहे. यात गुंतवणूक करून दर महिन्याला पेन्शन मिळवता येईल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि नियमित उत्पन्न या दोन्ही गोष्टी मिळू शकतात.