महाशिवरात्री: तोडण्यापासून ते वाहण्यापर्यंत.. शिवलिंगावर बेल अर्पण करताना अशी घ्या काळजी

in #new2 years ago

मुंबई, 12 फेब्रुवारी : महाशिवरात्री हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बेलपत्र. बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, बेलपत्र अर्पण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे डोके थंड राहते. शिवपुराणात बेलपत्राचे महत्त्व सांगताना असे वर्णन केले आहे की, जो कोणी श्रावण महिन्यात भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करतो त्याला 1 कोटी कन्यादानाचे पुण्य मिळते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे नियम, बेलपत्र तोडण्याचे नियम आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने लाभ होतो -

  1. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने गरीबी दूर होते आणि धनात वृद्धी होते.
    image.png