कडक सॅल्यूट! Indian Army नं पाकिस्तानात घुसून 21 मिनिटांत 200 दहशतवाद्यांचा केला होता खात्मा

in #new2 years ago

![image.png](UPLOAD FAILED)
26 फेब्रुवारी 2019 च्या पहाटे, जेव्हा संपूर्ण देश शांतपणे झोपला होता, तेव्हा भारताच्या वायुसेनेचे शूरवीर पाकिस्तानमध्ये घुसले होते. सकाळी उठल्यावर बातमी आली होती की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला केला होता.

या बातमीची पहिली पुष्टी पाकिस्तानकडून करण्यात आली आणि लष्कराचे तत्कालीन प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट केले की, ''भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडली आहे आणि त्यात कोणतेही नुकसान झाले नाही.''
काही वेळातच, बालाकोट एअर स्ट्राइकची बातमी सोशल मीडियापासून मेन स्ट्रीम मीडियावर व्हायरल झाली. सकाळी 11 वाजता परराष्ट्र मंत्रालयाने प्रथमच अधिकृत निवेदन जारी केले.परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ''जैश भारताच्या विविध भागात आणखी एक आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची ठोस माहिती मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे, भारताने आज पहाटे बालाकोटमधील जैशच्या सर्वात मोठ्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केला. या स्ट्राइकमध्ये मोठ्या संख्येने जैशचे दहशतवादी, प्रशिक्षक, वरिष्ठ कमांडर आणि जिहादींचे गट जे फिदाईन म्हणून तयार झाले होते त्यांचा खात्मा करण्यात आला.''
ऑपरेशन बंदर :बालाकोट हल्ल्याला भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन बंदर' असे नाव दिले. 25-26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई तळावर खळबळ उडाली आणि त्यानंतर 20 लढाऊ विमानांनी उड्डाण केले.
पहाटे 3.30 ते 4 च्या दरम्यान 12 मिराज विमाने पाकिस्तानच्या देखरेख ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाला चुकवून पाकिस्तानात घुसली. या विमानांच्या मागे आणखी चार विमाने होती जी त्यांना घेऊन जात होती.
हेही वाचा: Russia Ukraine War: झेलेन्स्की यांचा निर्धार ;आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल.युद्धाचा काळ वेदनादायी, साहसी आणि ऐक्याचा

काही मिनिटांतच लढाऊ विमानांनी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करून सर्व तळ उद्ध्वस्त केले आणि अनेक दहशतवाद्यांना ठार केले. विमानांना प्रवेशापासून परत येण्यासाठी फक्त 21 मिनिटे लागली.पुलवामा हल्ल्याचा बदला :14 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना, दुपारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी आली.सुरुवातीला असे सांगण्यात आले की सुमारे 10 जवान शहीद झाले आहेत परंतु जेव्हा संपूर्ण माहिती समोर आली तेव्हा कळले की लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला ज्यामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले.
हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

या बातमीनंतर संपूर्ण देशात शांतता पसरली. दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान दिल्लीला परतले आणि त्यांनी सर्व सुरक्षा अधिकारी आणि कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर बालाकोट हवाई हल्ल्याची योजना तयार करण्यात आली.