Gadar 2: 'गदर 2' सुरु असतांना थिएटरबाहेर बॉम्बस्फोट! दोन जण ताब्यात

in #newlast year

image.png
Gadar 2: सनी देओलचा बहुप्रतिक्षित गदर 2 सिनेमा प्रदर्शित होऊन सात दिवस झाले असून सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे. चित्रपटात सनी पाजीचा दरारा आणि हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन गेले आहे. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहेत तर दुसरीकडे पटना येथे हा सिनेमा सुरु असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे.पाटन्यातून एक घटना समोर आली आहे. जिथे चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काहींनी चित्रपटगृहांच्या बाहेर बॉम्ब फेकले आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील धमकावलं. त्यात दोन संशयितांनी थिएटरच्या बारवर कमी-तीव्रतेचे बॉम्ब फेकले, त्यापैकी एकाचा स्फोट झाला. संशयितांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: Bipasha Basu’s daughter Devi: ना डिस्को ना लोरी! बिपाशाच्या लेकीला आवडते हनुमान चालिसा... व्हिडिओ व्हायरल

या सिनेमा हॉलचा मालक सुमन सिन्हा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून सांगितले की, संशयितांना गदर 2 ची तिकिटे ब्लॅकमध्ये विकायची होती, मात्र कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांना असे करु दिले नाही तेव्हा हल्लेखोरांनी हा स्फोट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. वेळीच कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले नाहीतर खुपच गंभीर असं काही घडलं असतं असं देखील ते म्हणाले.
हेही वाचा: Amitabh Bachchan: जया, रेखा कि हेमा! बिग बींची आवडती अभिनेत्री कोण? स्वत: केला खुलासा

हा स्फोट थिएटरपासून खूप दूर झाला आणि त्यांनी सिनेमाच्या कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यांना वेळीच पोलिसांनी पकडले आणि नंतर कारवाई केली.