इस्रो’च्या ‘चांद्रयान ३’ मोहिमेशी मुंबईचं आहे खास नातं; जाणून घ्या

in #newlast year

image.png
शुक्रवारी चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या इस्रोच्या चांद्रयान-३ या यानाच्या निर्मितीमध्ये मुंबईतल्या गोदरेज एरोस्पेस आणि एल अँड टीचाही मोठा हातभार आहे. या दोन्ही कंपन्यांचे चांद्रायन ३ मोहीमेतलं योगदान जाणून घेऊया...काय आहे गोदरेज एरोस्पेस? गोदरेज एरोस्पेसचे सहायक उपाध्यक्ष माणेक बेहरामकमदिन तसेच सीईओ अनिल वर्मा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. गोदरेजतर्फे तयार करण्यात येत असलेल्या क्रायोजेनिक इंजिनाचे तसेच विकास इंजिनाचे भागही पत्रकारांना दाखवण्यात आले होते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसची गोदरेज एरोस्पेस ही व्यवसाय शाखा आहे.अंतराळ मोहिमांमध्ये कंपनीचे योगदान काय? वर्षानुवर्षे कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी तसेच मंगळयान, चांद्रयान मोहिमांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाईट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल, बारा मीटरचा अँटेना, ग्राऊंड सिस्टीम आदींचे महत्त्वपूर्ण घटक तयार केले आहेत. हल्लीच्या एनव्हीएस - ०१ उपग्रहाच्या प्रक्षेपणासह इस्रोच्या प्रत्येक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही प्रक्षेपणातही कंपनीचा हातभार असतोच, असेही सांगण्यात आले.लढाऊ विमानांची इंजिनेनागरी विमान वाहतूक क्षेत्रातही रोल्स रॉयस, बोइंग, जीई आदी मोठ्या कंपन्यांशी सहकार्य करून विमानांच्या महत्त्वाच्या भागांचा विकास व निर्मितीचे कामही गोदरेज एरोस्पेस करीत आहे. तसेच जीटीआरई तंत्राने व हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या सहकार्याने लढाऊ विमानांची इंजिनेही आम्ही लवकरच तयार करू, असा विश्वास बेहरामकमदिन यांनी व्यक्त केला.क्रायोजेनिक इंजिनचं कार्य काय? कित्येक वर्षांपूर्वी अमेरिकेने भारताला क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान नाकारल्यावर इस्रोने स्वबळावर काही वर्षांतच त्याची निर्मिती केली. आता गोदरेजने हे तंत्रज्ञान आत्मसात केले असून २० टनांपर्यंतची क्रायोजेनिक इंजिने मावतील, असे भाग आम्ही तयार करू शकतो, असेही बेहरामकमदिन म्हणाले. क्रायोजेनिक इंजिनांचे भागही या कंपनीत तयार केले जातात.
हेही वाचा: Chandrayaan-3 Launch : चांद्रयान-3 आणि चांद्रयान-2 मध्ये कोणता फरक? जाणून घ्या प्रक्षेपणापासून लक्ष्यापर्यंत अनेक गोष्टी

कडेकोट सुरक्षाशत्रुराष्ट्राकडून या तंत्रज्ञानाची चोरी वा हेरगिरी होऊ नये म्हणून कंपनीत अत्याधुनिक संगणक सुरक्षा व्यवस्था आणली आहे. तिला आयएसओ प्रमाणपत्रही घेतले जाते, तसेच केंद्रीय सुरक्षा संस्थांतर्फे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिटही होते, असेही बेहरामकमदिन यांनी ‘सकाळ’ला सांगितले.एल अँड टीचे योगदान एल अँड टी पाच दशके देशाच्या अंतराळ कार्यक्रमाशी संलग्न आहे. आता चांद्रयान मोहिमेतही महत्त्वाच्या सव्वातीन मीटर रुंदीच्या महत्त्वाच्या बूस्टरची निर्मिती तसेच त्यांची दबावाखाली चाचणीही एल अँड टीच्या पवई येथील कारखान्यात घेण्यात आली आहे; तर एल अँड टीच्या कोईमतूर येथील हायटेक एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीतही अन्य भाग बनवले आहेत. या सर्व भागांची कठोर चाचणी घेऊन वेळापत्रकापूर्वीच ते भाग इस्रोकडे सोपवले, अशी माहिती एल अँड टी डिफेन्स विभागाचे उपाध्यक्ष ए. टी. रामचंदानी यांनी दिली.