पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा प्रकारे साजरा केला रक्षाबंधनाचा सण? पाहा व्हिडिओ

in #newlast year

image.png
आज देशभरात उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा होतो आहे. बहीण-भावाच्या गोड नात्याचा हा सण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साजरा केला. पंतप्रधानांना शाळकरी मुलींनी आज राख्या बांधल्या. दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी, म्हणजेच 7 लोक कल्याण मार्गावर हा कार्यक्रम पार पडला. याठिकाणी विविध शाळांमधील मुली उपस्थित होत्या. या सर्वांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्यानंतर पंतप्रधानांनी या मुलींसोबत ग्रुप फोटो देखील काढला.पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छादरम्यान, पंतप्रधान मोदींनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत देशातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या."माझ्या सर्व कुटुंबीयांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणी भावामध्ये असणारा अतूट विश्वास आणि अगाध प्रेमाला समर्पित रक्षाबंधनाचा पवित्र सण हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सद्भाव आणि सौहार्दाची भावना अधिक दाट करेल, अशी माझी इच्छा आहे." असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.