: चिनी अभियंत्यांवर पाकिस्तानमध्ये हल्ला; बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी

in #newlast year

image.png
ग्वादार(Baluchistan)- पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी चिनी अभियंत्यांच्या एका चमुवर हल्ला करण्यात आला आहे. शस्त्रसज्य दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय.पोलिस कारवाईत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय. सकाळी जवळपास साडे नऊ वाजता हा हल्ला झाला. त्यानंतर अजूनही दहशतवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्ष सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. स्थानिक न्यूज 'बलुचिस्तान पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या ग्वादार शहरात स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.रिपोर्टनुसार, शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला झालेल्या घटनेची पुष्टी केली आहे. चिनी अभियंत्यांवरील हल्ला फकीर कॉलोनीच्या जवळ झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारले आहेत. अजूनही पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.रिपोर्टनुसार, शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला झालेल्या घटनेची पुष्टी केली आहे. चिनी अभियंत्यांवरील हल्ला फकीर कॉलोनीच्या जवळ झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारले आहेत. अजूनही पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.