चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वीच 'या' कंपनीच्या शेअरमध्ये झाली 10 टक्के वाढ

in #newlast year

image.png
देशच नाही तर संपूर्ण जगाच्या नजरा भारत आणि चांद्रयान 3 वर आहेत. चांद्रयान 3 तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.या कंपनीचे नाव भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आहे. ज्याच्या शेअर्समध्ये मंगळवारी 10 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. ही एक सरकारी कंपनी आहे, जिला महारत्नाचा दर्जा मिळाला आहे. चांद्रयान तयार करण्यात भेलचे मोठे योगदान आहे.कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढमंगळवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेलच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 111.05 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर केवळ दिवसाचाच नाही तर 52 आठवड्यांचा उच्चांक 112.75 रुपयांवर पोहोचला.कंपनीचा शेअर सोमवारी 100.85 रुपयांवर बंद झाला आणि मंगळवारी 101.25 रुपयांवर उघडला. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सावधान, ही छोटीशी चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

चालू वर्षात 38 टक्के परतावा दिलाचालू वर्षात भेलच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.गेल्या एका महिन्यात या शेअर्समधून गुंतवणूकदारांची कमाई 13 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत आणि 109 टक्के परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी अवघ्या एका आठवड्यात सुमारे 10 टक्के कमाई केली आहे.