Honda Shine : सर्वांची लोकप्रिय होंडा शाईन नवीन डिझाईन मध्ये लॉन्च!

in #new2 years ago

Shine : होंडा शाईन ही या वर्षात मोठ्या प्रमाणात विक्री होणार बाइक (Bike) ठरली आहे. अनेकजण या गाडीचे चाहते आहेत. आता तुम्ही देखील Shine खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

कारण Honda ने आपल्या लोकप्रिय बाईक Shine चे नवीन सेलिब्रेशन एडिशन लॉन्च (Celebration Edition Launch) केले आहे. ही 125 सीसी मोटरसायकल आहे. त्याच्या ड्रम व्हेरिएंटची (drum variant) किंमत 78,878 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या डिस्क व्हेरिएंटची (disk variant) किंमत (Price) यापेक्षा जास्त आहे.