शिक्षणाचा मूलभूत विचार देणारे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

in #naws2 years ago

वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, ‘‘मी खालच्या जातीत जन्मलो असलो, तरी मीही माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये, असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं, या मुलांना हे अवघड गणित?’’ भीमाने फळ्यावर सम आणि विषम संख्या अगदी अचूक लिहिल्या. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली. आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, ‘‘गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं; पण फळ्यामागचं गणित उमजलं नाही हो. समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला पण ‘विषम’ संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो.’’ हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! (Basic idea of ​​education Dr Babasaheb Ambedkar article by sachin usha vilas joshi Nashik Latest Marathi article)गुरुजी वर्गात सम आणि विषम संख्या शिकवत होते. समसंख्या आणि विषमसंख्या कोणती, ते उदाहरणासह समाजवून सांगत होते. गुरुजींनी विचारलं, ‘‘समजलं का सर्वांना?’’ मुलांचं गुरुजींच्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं; त्यामुळे गुरुजी चिडले. सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले. भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणेदारपणे गुरुजींना म्हणाला, ‘‘मला गणित समजलं आहे. माझं तर तुमच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. मग मी शिक्षा का म्हणून घेऊ?’’ त्यांच्या या बोलण्याचा गुरुजींना राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘तुला गणित समजलं?’’ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

शिक्षणाचा मूलभूत विचार देणारे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Published on : 20 August 2022, 3:00 pm

By
सचिन उषा विलास जोशी

वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, ‘‘मी खालच्या जातीत जन्मलो असलो, तरी मीही माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये, असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं, या मुलांना हे अवघड गणित?’’ भीमाने फळ्यावर सम आणि विषम संख्या अगदी अचूक लिहिल्या. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली. आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, ‘‘गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं; पण फळ्यामागचं गणित उमजलं नाही हो. समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला पण ‘विषम’ संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो.’’ हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! (Basic idea of ​​education Dr Babasaheb Ambedkar article by sachin usha vilas joshi Nashik Latest Marathi article)गुरुजी वर्गात सम आणि विषम संख्या शिकवत होते. समसंख्या आणि विषमसंख्या कोणती, ते उदाहरणासह समाजवून सांगत होते. गुरुजींनी विचारलं, ‘‘समजलं का सर्वांना?’’ मुलांचं गुरुजींच्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं; त्यामुळे गुरुजी चिडले. सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले. भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणेदारपणे गुरुजींना म्हणाला, ‘‘मला गणित समजलं आहे. माझं तर तुमच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. मग मी शिक्षा का म्हणून घेऊ?’’ त्यांच्या या बोलण्याचा गुरुजींना राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘तुला गणित समजलं?’’

‘‘हो गुरुजी.’’‘‘तुझं लक्ष फळ्याकडेच होतं?’’‘‘हो गुरुजी.’’‘‘मग घे हा खडू आणि फळ्यावर सम आणि विषम संख्यांची पाच उदाहरणं लिहून दाखव.’’गुरुजींनी त्याच्याकडे फेकलेला खडू भीमाने अगदी अलगद झेलला आणि तो फळ्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात वर्गातील सगळी मुलं उठली नि धावपळ करत फळ्याकडे गेली. त्यांनी फळ्याच्या मागे ठेवलेले त्यांचे जेवणाचे डबे तेथून उचलून दुसरीकडे ठेवले. का? तर भीमाच्या स्पर्शामुळे त्यांचे डबे बाटतील. तो अस्पृश्य म्हणून त्याच्या सावलीमुळे ते दूषित होतील. तत्कालीन विद्यार्थ्यांच्या मनावरही सामाजिक दृष्टिकोनाचा झालेला हा एक वाईट परिणाम होता. वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, ‘‘मी खालच्या जातीत जन्माला आलो असलो तरी मीपण माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये, असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं या मुलांना हे अवघड गणित?’’भीमाने फळ्यावर सम आणि विषमसंख्या अगदी अचूक लिहिल्या. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली. आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, ‘‘गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं; पण फळ्यामागचं गणित मला उमजलं नाही हो.’’ समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला; पण ‘विषम’ संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो.’’ हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला महू गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ नि आईचं भीमाबाई. भीमाबाईंचा मुलगा म्हणून त्यांचं नाव ‘भीमराव’ ठेवलं. याच भीमरावाने पुढे भारताच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वांना शिक्षणाचा समान हक्क मिळवून दिला. जागतिक पातळीवर समानतेच्या मूल्याला महत्त्व प्राप्त करून दिलं. पुढे हा शिक्षणव्यवस्थेचा पाया राहिला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हे जीवनसूत्र त्यांनी सर्वांना शिकवलं. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ शिक्षण नाही मिळाली जरी, कुठे काय बिघडलं तरी? हा दृष्टिकोन मुळातच बदला. काही मिळवायचं असेल, तर संघर्ष आणि कष्टाला पर्याय नाही, हे त्यांनी अत्यंत कळकळीने वारंवार सांगितलं आणि स्वतःच्या कृतिशीलतेतून सर्वांना पटवूनही दिलं.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे करोडो उपेक्षित दुर्बल दलितांचं प्रेरणास्थान!समाजसेवक, राजकारणी, संपादक, दलितांचे उद्धारक, बुद्धिवादी, समीक्षक, अर्थतज्ज्ञ, घटनाकार, संघटनकुशल, इतिहास घडवणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!भारतमातेचे एक महान सुपुत्र! लहानपणी अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरं जात अतोनात जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. वेळप्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. एक पाव आणि एक कप कॉफीच्या आधारावर अठरा-अठरा तास अभ्यास केला. अभ्यास बरेच जण करतात; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वैष्टिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय ठरते ती त्यांची व्यासंगी वृत्ती. अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना व्यासंग जमतेच, असं नाही. मुळात असलेल्या विद्वत्तेला अत्यंत सखोल विचार करण्याची लागलेली कष्टप्रद सवय म्हणजे व्यासंग..! त्याची साथ बाबासाहेबांनी कधी सोडली नाही. म्हणूनच त्यांच्या विद्वत्तेला कायम व्यासंगपूर्णतेची जोड मिळाली आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उत्तर ते नेहमीच सर्वांगपूर्णतेने निरखू शकले, अजमावू शकले, अमलात आणू शकले. त्यांची झेपच मोठी होती. वृत्ती अजिबातच कूपमंडूक नव्हती. आश्चर्य म्हणजे व्यापक आणि सखोल विचार एकावेळी करू शकण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं. हेच कौशल्य भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये येणं अपेक्षित आहे. अभ्यासासोबत सामाजिक जाण, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी खोलपर्यंत विचार करणं या गोष्टी देशाचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी गरजेच्या असतात.अमेरिकेतील कोलंबिया या नावाजलेल्या विद्यापीठातून १९१५ मध्ये एम. ए., १९१७ मध्ये पीएच.डी. आणि त्यानंतर १९२३ मध्ये इंग्लंडमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थेतून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ आणि लंडनच्या ‘ग्रेज इन’मधून बॅरिस्टरची पदवी अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करून ते मायदेशी परतले.ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांच्यापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये भराऱ्या घेऊन त्यांनी मोलाची भर घातली आणि जगभरात त्यांच्या कामगिरीला कृतज्ञतापूर्वक मान्यता मिळत गेली.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻