सोलर प्रकल्प ‘मविआ’ने नाकारला; भागवत कराड

in #nanded2 years ago


औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणावर एक हजार मेगावॉटचा आणि १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला फ्लोटिंग सोलर पॅनल प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने नाकारल्याचा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी केली. तत्कालीन उद्योग व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना या प्रकल्पाबाबत पत्र पाठवूनही त्यांनी ‘जायकवाडी’वर सोलर बसू शकत नसल्याचे कळविल्याचा दावाही कराड यांनी केले आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मात्र हा प्रकल्प मनावर घेतल्याचेही म्हणाले. डॉ. कराड म्हणाले, ‘‘जायकवाडी जलाशय हे आठ ते दहा हजार हेक्टरचे आहे.