हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याबाबत केंद्राने मागितला सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ

in #nanded2 years ago


नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या इतर धर्मियांपेक्षा कमी आहे तेथे त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याबाबतच्या याचिकेत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला आहे. हा विषय अत्यंत संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा असल्याने आणखी माहिती जमवावी लागेल. त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली.मुख्यतः जम्मू-काश्मीर आणि ईशान्य राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा केंद्र सरकारने देण्याबाबतचा प्रस्ताव, हाच मुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मोदी सरकारने यापूर्वी संसदेत आणलेल्या सीएए विधेयकामध्ये याबाबत संकेत देण्यात आले होते. या मुद्यावर सरकारने आज न्यायालयात चौथ्या वेळेस प्रतिज्ञापत्र सादर केले.

केंद्र सरकारने यापूर्वीच एका अधिसूचनेद्वारे मुसलमान, पारशी, बौद्ध, शीख आणि अलीकडे जैन समाजाच्या नागरिकांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात ज्या राज्यांकडून केंद्राला माहिती पाठवण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेमध्ये ज्या राज्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी आहे तेथे त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा आणि तशा सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. या मुद्द्याचा न्यायालयाने निकाल दिल्यावर भारत सरकार या पुढच्या काळात कोणालाही ‘अल्पसंख्याक’ म्हणून अधिसूचित करूच शकणार नाही, असा उपाध्याय यांचा युक्तिवाद आहे.

केंद्राला या संदर्भात उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला होता. मात्र सरकारने आज प्रतिज्ञापत्र सादर करून वेळ वाढवून मागितला आहे. केंद्राने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या राज्यातील लोकसंख्येचा धार्मिक आधारावरील डेटा देण्याची सूचना केली होती. आतापर्यांत १४ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत आकडेवारी पाठवली आहे. उर्वरित राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशाकडून याबाबतचा डेटा येणे बाकी आहे. त्यामुळे सरकारला आणखी वेळ हवा, असे न्यायालयात सांगण्यात आले. याप्रकरणी झालेल्या चर्चे दरम्यान केंद्राची अनेक मंत्रालय सहभागी झाली होती.या राज्यांनी केंद्राला माहिती पाठविलीहिमाचल प्रदेश, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, मिझोराम, मेघालय, मणिपूर, ओडिशा, उत्तराखंड, नागालॅंड आणि लद्दाख, दादरा- नगर हवेली, दमण दीव व चंडीगड.
Web Title: Hindu Community Population Minority Status Supreme Court
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :Supreme Courtcentral govtHindu religionpopulation(minority people)
HomeDeshHindu Community Population Minority Status Supreme Court Oj05

Subscribe to Notifications