महापालिका शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल मागविला

in #nanded2 years ago


जळगाव : महापालिका शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा अहवाल मागविण्यात आला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका शाळांची संख्या सद्यःस्थितीत घटली आहे. ५१ शाळांवरून आज केवळ २३ संख्या झालेली आहे. त्यात मराठी माध्यमाच्या १२, ऊर्दू माध्यमाच्या १०, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. यात साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर महापालिकेकडे तब्बल १७५ शिक्षक आहेत. (Campaign for Student growth Report additional teachers in municipal schools has been called for Jalgaon News)