MLA Madhuri Misal यांना खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास दीराच्या खुनाची धमकी

in #nagpur2 years ago

Canva__83_.jpgपुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर खंडणी न दिल्यास त्यांचा दीर बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्याही मोबाईलवर मेसेज करून दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(MLA Madhuri Misal Demand for Ransom)