Ashish Shelar: आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी; आशिष शेलारांनी का केली मागणी?

in #nagpur2 years ago

4ashish_shelar.jpgराज्यात गेल्या काही दिवसांपासून वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. दरम्यान, वेदान्त-फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही करार झालेला नाही. असे एमआयडीसीने राम कदम यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे. (ashish shelar slams aaditya thackeray Midc Claim About Vedanta Foxconn )