Shinde-Fadnavis govt : शिंदे-फडणवीसांकडून काँग्रेसचीच ‘री'

in #nagpur2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Shinde-Fadnavis govt : शिंदे-फडणवीसांकडून काँग्रेसचीच ‘री'
Published on : 21 November 2022, 6:51 pm

By
दत्ता देशमुख

बीड : काँग्रेसमध्ये दिल्लीच्या इशाऱ्याशिवाय पान हालत नाही, राज्यात निर्णयाचे कोणालाच अधिकार नाहीत. म्हणूनच महिनोन् महिने निर्णय होत नाहीत अशी कायम टीका करणाऱ्या भाजप व आताचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारही त्यांचीच ‘री’ ओढत आहे. सरकार स्थापन होऊन पावणे पाच महिने होत आले असले तरी राज्यात अद्याप संपूर्ण मंत्रिमंडळ नाही. दिल्लीच्या इशाऱ्याशिवाय विद्यमान सरकारचेही पानही हालत नसल्याचे चित्र आहे. भाजपसाठी श्री. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या आणि दिल्लीचे ग्रीन सिग्नल ठीक आहेत. पण, स्वत:चा स्वतंत्र पक्ष असताना श्री. शिंदे यांच्यावरही दिल्ली वाऱ्यांची वेळ का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळातला विचार केला तर पंधरा वर्षांच्या तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसमध्ये निर्णय लवकर होत नव्हते.
मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा संघटनेतील फेरबदल असो याबाबत दिल्लीतून खलिता आल्यानंतरच निर्णय व्हायचा. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन वर्षे लोटूनही महामंडळांचे वाटप झालेच नाही. यावरून पूर्वी भाजपचे नेते काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत. राज्यातीलVishwas__58_.jpg