आव्हाड यांचं नवं ट्विट…आव्हाड यांचा रोख कुणावर…म्हणाले कोर्टात गेलं तर कोण फासावर जाईल…

in #nagpur2 years ago

ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या कारवाईच्या संदर्भात ट्विट केले आहेत. त्यावरून पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकाच आठवड्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. हर हर महादेव चित्रपटावरुन चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आमदारकीचा राजीनामा देखील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता. जितेंद्र आव्हाड यांना यादरम्यान जामीनही मंजूर झाला होता. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणावरून राज्यभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.awhad.jpg