Sharad Pawar: कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचा शरद पवारांनी केला रीव्ह्यू, म्हणाले...

in #nagpur2 years ago

Sharad pawar: नेहमीच्या साध्या-सरळ भूमिकांपेक्षा ऐतिहासिक भूमिका साकारणं केव्हाही कठीणचं. कारण आपला इतिहास इतका मोठा आणि श्रीमंत आहे तो त्या पद्धतीनेच प्रेक्षकांपर्यंत जाणं म्हत्त्वाचं असतं. आणि फार कमी नट किंवा नट्या अशा आहेत ज्यांना या ऐतिहासिक भूमिका साकारण्याचं भाग्य लाभतं. डॉ. अमोल कोल्हे हे त्यापैकीच एक नाव. करिअरच्या अगदी सुरुवातीला डॉ. अमोल कोल्हे यांना नितिन देसाई यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलेलं आपण सर्वांनीच पाहिलं. पुढे अनेकदा कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले. छत्रपती संभाजी महाराजही साकारण्याचं भाग्य डॉ. अमोल कोल्हेंना लाभलं. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी त्या