Pankaj Tripathi: 'कालीनभैय्या' झाला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन'

in #nagpur2 years ago

Pankaj Tripathi Actor: आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करुन चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले त्या पंकज त्रिपाठीच्या नावावर आणखी एक कौतूकास्पद कामगिरीची नोंद झाली आहे. तो आता देशाच्या निवडणूक आयोगाचा राजदूत म्हणून काम पाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्याकडे नॅशनल आयकॉन म्हणून जबाबदारी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजच्या नावाची चर्चा सुरु होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मिर्झापूरच्या कालीनभैय्याचे नाव आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत राहणार असल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Sort:  

https://wortheum.news/@balraj
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻