राजीनामा मंजुरीसाठी ऋतुजा लटके न्यायालयात

in #nagpur2 years ago

मुंबई : ‘पालिका प्रशासनाने क वर्ग श्रेणीतील कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा लटकवून ठेवला आहे. राजीनामा मंजुरीसाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आयुक्त आणि सामान्य प्रशासन यांच्याकडून राजीनामा मंजुरीसाठी होणारी टोलवाटोलवी ही आयुक्तांवर दबाव असल्याचे स्पष्ट करते. त्यामुळेच राजीनाम्याच्या मुद्द्यावर लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. ‘अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ही जागा लढवणार आणि जिंकणार आहे,’ असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. वांद्रे पूर्व येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.