Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने पाण्याने धुतली बॅट, पाहा मजेशीर व्हिडीओ

in #nagpur2 years ago

sachin-tendulkar.jpgभारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर अनेक विक्रम (Record) आहेत. देशभरात सचिनने चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळल्यामुळे त्याचे सगळीकडे चाहते आहेत. सोशल मीडियावर (Social Media) त्याचे लाखो चाहते आहेत, त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयपीएलमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्स टीमला सल्लागार म्हणून आजही महत्त्वाची भूमिका बजावताना सचिन दिसतो.