ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, आता सर्व अधिकार ‘म्हाडा’ला

in #nagpur2 years ago

Jirendra Awhad : महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी होती. मविआच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना सगळे अधिकार ही सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचं काम हे फक्त प्रस्ताव तयार करणं आणि ते सरकार दरबारी पाठवणं इतकीच मर्यादित राहिली होतीमुंबई : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय (Government Decisions) रद्द करण्यात आले आहेत. आता गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पुन्हा एकदा म्हाडा आणि विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. आव्हाड यांच्या काळातील सर्व शासन निर्णय रद्द करत शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) एकप्रकारे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्काच दिल्याची चर्चा रंगली आहे. गुरुवारी याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत