पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरच्या घोष

in #nagpur2 years ago

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.पुणे : पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) देखील चांगलेच आक्रमक झाले आहे. ट्विटरवर एक परित्रक जारी करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.