PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी

in #nagpur2 years ago


महागाई जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. 7 सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रा' सुरू होण्याआधी महागाई ते बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात काँग्रेस रामलीला मैदानावर आंदोलन चालू आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि महागाई या दोन विषयावर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रामलीला मैदानावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकार मोदी बोलताना म्हणाले की, देशातील बेरोजगारी, देशातील महागाई आणि देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत.पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला हे बोलणे आवडत नाही, पण हा देश आपल्या तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. ते म्हणाले, दोन उद्योगपती देशाला रोजगार देऊ शकणार नाहीत. लघुउद्योग देशाला रोजगार देतात, शेतकरी देतात. मात्र मोदी सरकारने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

Sort:  

सर मैंने आपकी 7 दिन की सभी खबरों को लाइक कर दिया आप भी मेरी आईडी खोल कर सभी खबरों को लाइक कर सहयोग करें जी