Mumbai Airport उडवून देण्याचा धमकीचा ईमेल; सुरक्षा बंदोबस्तात वाढ

in #nagpur2 years ago

Photo__4_.jpg
मुंबई विमानतळ उडवून टाकण्याचा धमकीचा ईमेल आला आहे. धमकीचा ई-मेल आला आहे त्यात विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल मिळताच तातडीने विमानतळ प्राधिकरणाने विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे आणि विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (bomb blast on mumbai airport threaten email recieved)
दरम्यान, हा ईमेल नेमका कुठून आला आणि कोणी पाठवला आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले, परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही.यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षालाही व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेच आले होते. ज्यामध्ये मुंबई शहर हादरल्याची चर्चा होती. त्यादरम्यान दहशतवादी मुंबईत घुसल्याचेही संदेशात म्हटले होते. हा व्हॉट्सअॅप मेसेज गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती.