MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज

in #nagpur2 years ago


शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सत्तार यांनी अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये
राज्यातील सत्ता संघर्षातील शिवसेनेच्या चिन्हाचा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बी प्लॅन तयार ठेवला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून जर धनुष्य बाण चिन्ह गोठवण्यात आलं तर नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या सुचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सत्तार यांनी अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंडकी खाणारा डॉयनासॉर असे म्हटलं आहे. दरम्यान देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर याच्याआधी केंद्राकडून कारवाई करण्यात आली आहे. आता राज्य सरकार देखिल असे पाऊल उचलत आहे. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर आता राज्य सरकार देखिल कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.