Delhi : ऐतिहासिक 'राजपथ'चं बदलणार नाव, आता 'ही' असेल नवी ओळख

in #nagpur2 years ago

bhushan_esakal___2022_09_05T195505_734.png
नवी दिल्ली : भारत सरकार नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे
तसेच राजपथला लागून असलेल्या सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यानुसार खाद्यपदार्थांचे स्टॉल, चहूबाजूंनी हिरवळ असलेले लाल ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट आणि चोवीस तास सुरक्षा असणार आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतच्या संपूर्ण मार्गाचे 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उद्घाटन करतील.
हा झोन 20 महिन्यांनंतर लोकांसाठी खुला होईल. उद्घाटनाच्या दिवशी अभ्यागतांना इंडिया गेटपासून मानसिंग रोडकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु ते उर्वरित भाग वापरू शकतात.नऊ सप्टेंबरपासून हा संपूर्ण ब्लॉक सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पाची कार्यकारी एजन्सी सीपीडब्ल्यूडीने येथे पाच विक्री झोन तयार केली आहेत, जिथे प्रत्येक विक्री झोनमध्ये 40 विक्रेत्यांना परवानगी दिली जाईल. इंडिया गेटमध्ये दोन ब्लॉक असतील आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये आठ दुकाने असतील, तर काही राज्यांनी स्वतःचे डिश स्टॉल्स लावण्यात स्वारस्य दाखवले आहे, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Sort:  

Nitesh bhau parande like my