Congress President Election : पुन्हा एकदा घडणार 25 वर्षे जुना इतिहास; जाणून घ्या कसा

in #nagpur2 years ago


Congress President Election : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 25 वर्षांच्या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होऊ शकते. कारण सध्याची परिस्थिती आणि राजकीय वातावरण काहीसे याच दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत यावेळी एकापेक्षा जास्त उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाऊ शकतात. काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या एका वर्गातर्फे असे करण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 25 वर्षे घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. यामध्ये भविष्यासाठी संपूर्ण मसुदा तयार करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या हायकमांडवर आरोप करत अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत आहेत, त्यावरून गांधी घराण्यातील एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गांधी परिवाराकडून कोणीही रिंगणात उतरणार नसल्याची चर्चा आहे.
काँग्रसकडून कोण असणार उमेदवारजर, गांधी परिवाराकडून अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज दाखल केला नाही तर, मग काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना उमेदवार केले जाऊ शकते अन्यथा युवा नेतृत्वाच्या शोधात सचिन पायलट यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय केरळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दक्षिण भारतातील काही नेत्यांसह कर्नाटकातील काही नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, या सर्वांशिवाय आणखी अनेक नेते पक्षात अध्यक्षपदासाठी दावा मांडू शकतात, अशीही चर्चा जोरात सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावा करण्याच्या तयारीत असलेल्यांमध्ये काँग्रेसच्या नाराज गटाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, पक्षात लोकशाही व्यवस्थेनुसार निवडणुकीची चर्चा होत असल्याने नाराज नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही. उमेदवारांमध्ये दक्षिण भारतातील काही नावे असल्याचे सांगितले जात आहे. तर उत्तरेकडील राज्यांतील अनेक नेतेही केवळ निषेध नोंदवण्याच्या निमित्ताने निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻