80 फूट दरीत कोसळलेला ट्रक अडकला झाडावर, घटना कॅमेऱ्यात कैद

in #nagpur2 years ago


विशेष म्हणजे ट्रक दरीत कोसळत असताना तो कॅमेऱ्यात कैद झाला.
ही थरारक घटना आहे सोलापूर (Solapur)- बुऱ्हाणपूर – इंदोर महामार्गावरील. बुलढाणा शहरानजीक असलेल्या राजूर (Rajur) घाटात एक ट्रक बुलढाण्याकडे जात होता. तेवढ्यात ट्रक रस्त्याच्या कडेला फसला. या रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकमुळं वाहतूक (Traffic) विस्कळीत झाली. दोन्ही बाजूला रांगा लागल्या. एका बाजूला डोंगर तर, दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी परिस्थिती होती.