कोरोना काळात तुम्ही रात्री काय करत होता हे काढायला लावू नका; अंबादास दानवेंचा भुमरेंना इशारा

in #nagpur2 years ago


पालकमंत्री ठरवताना दीड पावणे दोन महिने लागले. एकाच मंत्र्याकडे सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. त्यामुळेच हे सरकार विसंवादी आणि असंवेदनशील आहे.
आम्ही उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) भेटायला जायचो तेव्हा ते मास्क लावूनच असत. त्यांचा मास्क कधी उतर नव्हता. सरकार गेलं आणि त्यांचा मास्क गेला. खुर्ची बरोबर कोरोनाही गेला, अशा शब्दात पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. भुमरे यांच्या या टीकेवर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. कोरोना काळात तुम्हीही काय केलं हे तपासलं पाहिजे. तुम्ही दिवसा काय करत होता आणि रात्री काय करत होता हे काढायला लावू नका, असा इशारा देतानाच भुमरेंनी नमक हरामी आणि हरामखोरीची भाषा करू नये, असा सज्जड दमच अंबादास दानवे (ambadas danve) यांनी भरला आहे.