अमेरिकेत सर्वात मोठं चक्रीवादळ, फ्लोरिडातल्या घरांत पाणीच पाणी,

in #nagpur2 years ago


अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात बुधवारी इयान चक्रीवादळाने धडक दिली. फ्लोरिडात मुसळधार पाऊस सुरु असतानाच सुसाट वेगानं वादळ आल्यानने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली.
अमेरिकेत फ्लोरिडाच्या (Florida) दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर शक्तिशाली चक्रीवादळ धडकले आहे. आधीच मुसळधार पाऊस सुरु असताना तब्बल 250 किमी प्रतितास या वेगाने हे चक्रीवादळ (Hurricane) दाखल झालं. त्यामुळे फ्लोरिडाची स्थिती गंभीर झाली आहे. मागील काही दशकांमधील अमेरिकेतील (America) हे सर्वाधिक शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं म्हटलं जातंय.