त्वचेसाठी विषासमान आहेत या चार गोष्टी, लगेच करा बंद!

in #nagpur2 years ago


अकाली म्हातारपण कुणालाच आवडत नाही. त्यात चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तर अधिकच वाटते. हे टाळायचे असेल तर आहारातील या गोष्टींना व्यर्ज करणे आवश्यक आहे.
मुंबई, चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkle on face) पडणे म्हणजे वृध्दत्वाकडे (Aging) वाटचाल सुरु झाल्याचे संकेत असल्याचे सहसा मानले जाते, मात्र आधुनिक काळात एन चाळिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागल्या आहेत. वृद्धत्वाला दूर ठेवण्यासाठी तुमचा आहार आणि जीवनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशा काही गोष्टी आहेत ज्या पाळल्याने वृद्धत्वाला दूर ठेवता येईल (Anti-aging Tips). यामध्ये आहारातल्या काही घटकांचा समावेश आहे. आहारात या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागता.