म्हणून युतीची सत्ता असताना शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारलं,

in #nagpur2 years ago


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्ह एकदा शिवसेना (Shiv Sena) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला आहे. युती सरकारच्या काळात 2014 साली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही. आपण जर उपमुख्यमंत्रीपद घेतलं तर मला उपमुख्यमंत्री करावे लागेल असं त्यांना वाटलं, त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसावं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.