विवाहितेच्या हत्या प्रकरणात पोलिसांची भुमिका संशयास्पद

in #murder2 years ago

IMG-20220707-WA0015.jpg

पोलीस आयुक्तांकडे फिर्यादीची तक्रार

यवतमाळ प्रतिनिधी दि ९ जुलै -: वाशिम जिल्हयातील कारंजा येथील हबीब नगर निवासी विवाहित मुस्कान परविन हिला सासरच्यांनी संगनमत करून कट रचून जिवानिशी ठार केले असुन त्या मारेकऱ्यांना कारंजा पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप मृतक महिलेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
यामुळे पोलिसांची भुमिका संशयास्पद असून त्यांची चौकशी करून तपास अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा अशी मागणी एका निवेदनातून मृत विवाहितेचे भाऊ यवतमाळ येथील इंदिरा नगर निवासी राजा अली नौशाद अली यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त यांना नुकतेच पाठविले आहे. निवेनात म्हटले आहे की मृत विवाहितेचा पती समीर खान सलीम खान, सासरा सलीम खान बिस्मील्ला खान, सासु तैमुननीसा सलीम खान, रेशमा परवनी वाजीद खान, देवर अमीन खान उर्फ सोनु सलीम खान सर्व रा. हबीब नगर कारंजा जि.वाशिम यांनी तिचा
संगनमताने खून केला असून केवळ आत्महत्येचा दिखावा केला असल्याची तक्रार कारंजा पोलीस स्टेशनमध्ये 28 जुन 2022 ला करण्यात आली.या प्रकरणात कारंजा शहर पो.स्टे.चे ठाणेदार व तपास अधिकारी यांची भुमिका संशयास्पद असून ते आरोपींना अभय देत असल्याचा आरोप निवेदनात तक्रारदाराने केला आहे. पोलीसांनी फक्त वरील आरोपीं पैकी केवळ समीर सलीम खान यालाच अटक केली, अन्य आरोपींना अद्याप अटक केली नाही, विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केवळ हुंड्याकरीता करण्यात आला,तिचा पती वारंवार व्यापारीका माहेरहून 2 लाख रूपये आणण्याची मागणी करीत होता, 28 जून ला सासरकडील मंडळींनी सदर विवाहितेला मारहाण करून फासावर लटकविल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींना अटक करावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रतिलीपी एसपी वाशिम, जिल्हाधिकारी वाशिम, पोलीस महानिरिक्षक अमरावती, पोलीस महासंचालक मुंबई, मुख्यमंत्री, मानव अधिकार मुंबई, उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ नागपूर आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.