बाळासाहेबांच्या शिवसेनेत तीनतिघाडा काम बिघाडापक्षाच्या तीननेत्यांमध्ये कायचाललंय

in #mumbai2 years ago

शिंदे गटाची नाशिकमधील स्थिती बघता दादा भुसे, सुहास कांदे आणि हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त दूसरा मोठा नेता कोणीही नाही, पक्ष वाढवितांनाही मोठे पदाधिकारी कोणीही गळाला लागलेले नाहीत.नाशिक : बाळसाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेत नाशिकमध्ये तीन प्रमुख नेते आहेत, त्यांच्या भोवतीच शिंदे गटाचा प्रवास सुरू आहे. मात्र, तिन्हीही नेत्यांमध्ये मतभेद असल्याने प्रत्येक जण आपली ताकद दाखविण्यासाठी ढाल-तलवार घेऊन मैदानात उतरण्यास सज्ज आहे. शिंदे गटाची नाशिकमधील स्थिती बघता दादा भुसे, सुहास कांदे आणि हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त दूसरा मोठा नेता कोणीही नाही, पक्ष वाढवितांनाही मोठे पदाधिकारी कोणीही गळाला लागलेले नाहीत. त्यामुळे नाशिकयामध्ये बाळसाहेबांची शिवसेना कधी आणि कशी वाढणार असा प्रश्न असतांनाच तिन्ही नेत्यांमधील धुसफूस चर्चा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हे तिन्हीही नेते शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे नेते नाहीत. तिन्हीही पूर्वी वेगळ्या पक्षाचे असल्याने नाराजीची वाढती दरी भविष्यात धोक्याची घंटा बनू शकते.nashik-shinde.jpg