त्या’ ज्योतिष्यानेच केला खुलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशासाठी आले होते? काय म्हणाले?

in #mumbai2 years ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत यावेळी त्यांच्या पत्नी तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील होते.
चंदन पूजाधिकारी, नाशिकः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात गेले. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात (Ashok Kharat) यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर आपले भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा रंगतेय. इशानेश्वर मंदिराचे फोटो तर आहेत. पण भविष्य जाणून घेतले की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. घटनात्मक पदावरील व्यक्तीने भविष्य जाणून घेण्यासारख्या घटनांवर विश्वास कसा ठेवायचा, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर सिन्नर येथील ज्योतिषी अशोक खरात यांनीच स्पष्टीकरण दिलंय.CM-Shinde-1.jpg