Weather Update : Long Weekendच्या प्लॅनमध्ये पावसाचा खो! पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

in #mumbai2 years ago

मुंबई : तीन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर पावसानं थोडी उसंत घेतली खरी, पण तरीही अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. लाँग विकेण्डची मजा घेण्यासाठी तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुमचा प्लॅन चौपट होऊ नये यासाठी हवामान विभागाने दिलेला हा अलर्ट (IMD) तुम्हाला माहिती असायला हवा.

तुम्ही जर लाँग विकेण्डचा (Long Weekend) प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. हवामान विभागाने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्हांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐