Rishabh Pant चं प्रमोशन नाही, डिमोशन, पहिली पसंत का नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं

in #mumbai2 years ago

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध झाला. या मॅचच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंतला संधी मिळाली नव्हती. त्यावरुन बरीच चर्चा झाली. ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाची पहिली पसंत आहे, असा एक समज होता. कारण तो वनडे, टेस्ट आणि टी 20 तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळतो. त्यामुळे त्याला वगळल्यानंतर प्रश्न विचारलं जाणं, स्वाभाविक होतं. पण आता टी 20 फॉर्मेट मध्ये ऋषभ पंतच डिमोशन झाल्याचं दिसतय.