Kolhapur News : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुख घोषित, 'या' दोघांना मिळाली संधी!

in #mumbai2 years ago

7e6bc2b5a37a6c9f30728f4044852537166073185862888_original.jpgKolhapur News : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुखांची घोषणा खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले आहे.

सुजित चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रवींद्र माने यांच्याकडे हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीची पत्रे धैर्यशील माने आणि राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Sort:  

समय निकालकर हमारी भी खबर लाइक कर दीजिए