Asia Cup 2022 IND vs PAK: भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांचा काळाबाजार तेजीत! अधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

in #mumbai2 years ago

आशिया चषक स्पर्धा दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आशिया चषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगेल. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. तिकिटांची वाढती मागणी बघता काळाबाजर तेजीत सुरू झाला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान संघर्ष बघणे, ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. आशिया चषकानिमित्त लवकरच चाहत्यांना दोन्ही देशांचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन काही चाहत्यांनी तिकिटांची पुनर्विक्री करून काळाबाजार सुरू केला आहे. काही चाहते दुप्पट-तिप्पट किंमतीला भारत-पाक लढतीची तिकीटे विकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Sort:  

Like my post🙏🙏