Andheri Bypoll : भाजप-शिंदे गटाचा सहमतीचा उमेदवार शक्य

in #mumbai2 years ago

88ed4c19-f8a2-4b28-9c02-1457e2d2215c.jpgमुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्याकडून सहमतीचा उमेदवार उद्या (ता. १३) जाहीर होणार आहे. आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. परंतु लटके या मुंबई महापालिकेत नोकरीस असल्याने त्यांना नोकरीचा राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांनी तो महिन्याभरापूर्वी दिला आहे, मात्र तांत्रिक बाबींवर हा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसांत लटके यांच्या राजीनाम्याचा निर्णय न झाल्यास ठाकरे गटाला दुसरा पर्यायी उमेदवार शोधावा लागणार आहे