शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण?, ‘या’ नेत्याने स्पष्टच सांगितलं; दाखवला सर्वात मोठा पुरावा

in #mumbai2 years ago

संदीप राजोगळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली: शिंदे गटाने (shinde camp) शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला (election commission) पत्र देऊन एकनाथ शिंदे यांची आम्ही नेता आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या दाव्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. मात्र, शिंदे गटाचा हा दावा शिवसेना सचिव अनिल देसाई (anil desai) यांनी फेटाळून लावला आहे.