जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी

in #mumbai2 years ago

आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) संघाला जास्तीत जास्त विकेट्स मिळवून देऊ शकतो आणि तो आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघात असला पाहिजे. चोप्रा स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “चहलचे नाव मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात नव्हते. तुम्हा सर्वांप्रामाणेच मी देखील हैराण होतो. ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. संघ नॉकआउट फेरीच्या आधीच बाहेर झाला होता. अशात यावर्षीच्या विश्वचषक चहल खेळला पाहिजे.” चहलने मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १३ सामने खेळले आणि यामध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.

“आयपीएलमध्ये १७ सामन्यात त्याने २७ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश होता. भारताकडे जो खरोकर विकेट्स घेणारे गोलंदाज आहेत, तो चहल आहे. तो म्हणाला की, जेव्हा तुम्हा स्पिनर्सला संधी देता, तेव्हा अनेकदा त्यांना विकेट्स घेण्यापेक्षा धावा रोखण्याची जबाबदारीही दिली जाते. कुलदीप यादवने मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर फक्त दोन सामने खेळले आणि ३ विकेट्स घेतल्या. पण आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या होत्या. तुम्ही जर विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या शोधात असाल, तर वेगवेगळ्या गोलंदाजांना आजमावले पाहिजे. जर रवी बिश्नोई आणि कुलदीप यांत्यात निवड करायची असेल, तर मी कुलदीपला संधी देईल,” असे आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला.

आकाश चोप्रा पुढे असेही म्हणाला की, अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेलची आकडेवारीच सांगते की, ते अधिक विकेट्स घेऊ शकत नाहीत. म्हणजेच संघ विकेट्ससाठी त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही. चोप्राच्या मते संघाला चहल, बिश्नोई आणि कुलदीप विकेट्स मिळवून देऊ शकतात.

Sort:  

सर जी हमने आपकी 7 दिन तक कि खबरे लाइक कर दी है आप भी मेरी खबरे लाइक करे