टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा

in #mumbai2 years ago

![]( (Harare) येथे शनिवारी (२० ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात (Second ODI) झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करताना ३८.१ षटकात १६१ धावांवरच सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून (Zimbabwe vs India) या डावात सिन विलियम्स याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २५.४ षटकातच झिम्बाब्वेचे आव्हान पूर्ण केले. संजू सॅमसनच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने झिम्बाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. संजूव्यतिरिक्त (Sanju Samson) शिखर धवन आणि शुबमन गिल यांनीही ३३ धावा केल्या.

हा सामना जिंकत भारतीय संघाने दीर्घ काळापासून पाकिस्तानच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडला आहे. भारतीय संघाचा हा हरारेच्या मैदानावरील सलग ११ वा विजय होता. या विजयासह भारतीय संघाने एकाच मैदानावर (Most Consecutive Win At Same Ground) सर्वाधिक सलग ११ वनडे सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हरारेत भारतीय संघाच्या विजयाची साखळी २०१३ मध्ये सुरू झाली होती, जी आताही सुरूच आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेला हरारेत ३-० ने वनडे मालिकेत पराभूत केले होते.