Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा

in #mumbai2 years ago

Koffee With Karan 7, Katrina Kaif, Vicky Kaushal : विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? आता त्याचाही खुलासा झाला आहे.
Open in App

Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा
कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे बी-टाऊनचं सगळ्यांत लोकप्रिय कपल. गेल्यावर्षी 9 डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे दोघांनी लग्न केलं. अगदी थाटामाटात हे लग्न झालं. आता विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? चला तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. खुद्द कतरिनाने ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) या शोमध्ये तिच्या व विकीच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला.

कतरिना सिद्धांत चतुर्वेदी व ईशान खट्टर यांच्यासोबत ‘कॉफी विद करण 7’मध्ये पोहोचली. या तिघांचा ‘फोन भूत’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने का होईना कतरिनाने आपल्या लव्हस्टोरीवरूनही पडदा हटवला.‘कॉफी विद करण 7’मध्ये कतरिना सुहागरातपासून लव्हस्टोरीपर्यंत अनेक गोष्टींवर बोलली. खरं तर ‘कॉफी विद करण’ या शोमधून कतरिना व विकी यांच्या प्रेमाची ठिणगी पडली होती. या शोच्या एका सीझनमध्ये विकी कौशल सामील झाला होता. यादरम्यान करणने गमती गमतीत विकीला कतरिनाबद्दल छेडलं होतं. माझी व विकीची जोडी चांगली दिसेल, असं कतरिना म्हणाल्याचं करणने विकीला सांगितलं होतं. ते ऐकून विकी हातभर उडाला होता. करणने हाच धागा पकडून कतरिनाला प्रश्न केला.

अखेर तुमची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली? कारण याच शोमध्ये विकीसोबत माझी जोडी चांगली दिसेल, असं तू म्हणाल्याचं मला आठवतंय आणि त्यानंतर तुम्ही लग्न केलंत, असं करणने विचारलं. यावर कतरिनाला हसू आवरेना. ती म्हणाली, हो मला आठवतंय मी विकीबद्दल तसं म्हणाले होते. तो किती हॉट आहे, हे माहित नाही. पण विकी उंच आहे, त्यामुळे मी त्याच्यासोबत चांगली दिसेन, असं मला वाटलं होतं. पुढचं सगळं हा एक सुंदर योगायोग होता. कारण मीडियात माझ्या व विकीबद्दल चर्चा सुरू झाल्या, तोपर्यंत तरी आम्ही एकमेकांना डेट करत नव्हतो. आम्ही डेटींग करतोय, हे ऐकणं तेव्हा माझ्यासाठी एक विचित्र अनुभव होता. स्क्रीन अवार्डमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. खरं तर विकी कधीच माझ्या रडारवर नव्हता. हे सगळं अनपेक्षित होतं. कदाचित हे माझ्या नशीबात लिहिलं असावं आणि ते व्हायचंच होतं. जोया अख्तरच्या पार्टीत आम्हाला एकमेकांबद्दल फीलिंग असल्याची जाणीव झाली आणि मग आम्ही कधी प्रेमात पडतो ते कळलंच नाही. मला तर विकीबद्दल काहीही माहित नव्हतं. मी फक्त त्याचं नाव ऐकलं होतं. पण त्याला कधी भेटले नव्हते. पण जेव्हा भेटले, तेव्हा त्याने माझं मन जिंकलं, असंही कतरिना म्हणाली.

आणखी वाचा

Subscribe to Notifications
Get Latest Updates in Messenger
टॅग्स :Katrina Kaifकतरिना कैफVicky Kaushalविकी कौशलKoffee with Karan Season 6कॉफी विथ करण 6Karan Joharकरण जोहर
Open in App →

संबंधित बातम्या

बॉलीवुड करण जोहरचा खुमासदार अंदाज 'केस तो बनता है'मध्ये

बॉलीवुड Jhalak Dikhhla Jaa 10: या अभिनेत्रींमध्ये होणार 'काँटे की टक्कर', See Pics

बॉलीवुड Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

बॉलीवुड “प्रत्येक गोष्ट खोटी होती, लोकांना मूर्ख बनवलं गेलं”, ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले
बॉलीवुड बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'
बॉलीवुड कडून आणखी

बॉलीवुड तरच भक्त सिनेमा पाहतील...; ‘ब्रह्मास्त्र’बद्दल कॉमेडियन अतुल खत्रीनं केलं ट्विट, पाहून भडकले विवेक अग्निहोत्री

बॉलीवुड PHOTOS : तिच्यापुढे ऐश्वर्याही फिकी! ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तृषा कृष्णन आली अन् भाव खाऊन गेली!

बॉलीवुड Amitabh Bachchan : क्या हम फालतू पिक्चर बनाते है? अमिताभ बच्चन असं का म्हणाले? पाहा व्हिडीओ

बॉलीवुड आलिया ते अनन्यापर्यंत प्रत्येक स्टारकिड्सवर मात करतेय रविना टंडनची लेक; सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही टाकते मागे
बॉलीवुड PS-I Ponniyan Selvan Trailer: जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!!

शहर
मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा
सेक्शन
मनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य
About UsAdvertise with UsPrivacy PolicyContact UsFeedbackSitemapTerms of UseStatutory provisions on reporting ( sexual offences )Code of ethics for digital news websites
FOLLOW US :
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd

untitlekatv232_202209879361.jpg